ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्रथम प्रधान्य देणार - अंकुश आतकरे
गेवराई प्रतिनिधी : 25 MAY 2024
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सर विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या आदेशाने विभागीय उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सुनील पोपळे व जिल्हा उपाध्यक्ष सुनील मुंडे यांचे अध्यक्षतेखाली गेवराई तालुका कार्यकारणी जाहीर झाली. यावेळी सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून परत एकदा अंकुश आतकरे यांच्यावर जिम्मेदारी सोपवण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा गेवराई व गेवराई पत्रकार संघ गेवराई या दोन्ही पत्रकार संघाची कार्यकारणी दि. 22 मे रोजी ज्येष्ठ पत्रकार तथा विभागीय उपाध्यक्ष सुनील पोपळे व जिल्हा उपाध्यक्ष सुनील मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून अंकुश आतकरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष भागवत देशपांडे राजेंद्र नाटकर, सचिव तुळशीराम वाघमारे,सह सचिव ज्ञानेश्वर जाधव.शहराध्यक्ष कैलास हादगुले, कार्याध्यक्ष अनिल अगुंडे, कोषाध्यक्ष शिवनाथ काळे, सहकार्य अध्यक्ष सुदर्शन देशपांडे, सहकोषाध्यक्ष अरविंद कुलकर्णी .तर सदस्य रामहरी काकडे, मधुकर फुले, आर.के. थोरात, सचिन नाटकर, गणेश वीर यांच्या निवडी करण्यात आल्या.
याप्रसंगी नूतन तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे म्हणाले की, माझ्यावर परत एकदा तुम्ही जिम्मेदार टाकत मला अध्यक्ष केल्याने माझ्या पण जिम्मेदा-या आणखी वाढले आहेत. मी आजवर आपल्या संघातील सर्व पत्रकारांच्या अडीअडचणीला सामोरे जात होतो यापुढेही जाणार परंतु विशेषतः मी ग्रामीण भागातील पत्रकारांना जास्त प्राधान्य देणार असुन आपल्या संघाचे नाव लौकिक करण्यासाठी सदैव प्रयत्न करणार व सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार आपल्या संघाच्या माध्यमातून अनेक आडल्या नडल्यांची कामे करणार व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ पत्रकार सुनील पोपळे यांनी तर सूत्रसंचालन तुळशीराम वाघमारे व आभार प्रदर्शन सुनील मुंडे यांनी केले.
हेही पहा -----
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖