yuva MAharashtra मा.श्री.सुभाष कवडे "विशेष ग्रंथकार" पुरस्काराने सन्मानीत..

मा.श्री.सुभाष कवडे "विशेष ग्रंथकार" पुरस्काराने सन्मानीत..



                               VIDEO 
 


सांगली/भिलवडी दि. २७ : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या आद्य साहित्य संस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांना देण्यात येणारा शांतादेवी आणि बाबुराव शिरोळे पुरस्कार सोहळा पुणे येथील एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृह येथे दिनांक २६ मे रोजी आनंदमय वातावरणात पार पडला.

          नामवंत साहित्यिक  मा. श्री. सुभाष कवडे 
 
 यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक मा. श्री. सुभाष कवडे यांच्या बालकुमार साहित्य आणि बाळू कुमार यांच्यासाठी राबवलेली उपक्रम याची नोंद घेऊन त्यांना शांतादेवी आणि बाबुराव शिरोळे पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला.


  रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
 
  " माणसाने माणसाशी माणसासम वागणे " हे गीत सादर करुन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.
 
   परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
 
 
 लेखकाने समाजाच्या वेदना जाणवयाच्या असतात मूक लोकांचा आवाज लेखकाने बनायचे असते, लेखकाच्या लेखणीचे भय सत्तेला नेहमीच असते, लेखकाच्या लेखणीतून करुणा विस्तारत जावी यासाठी लेखकाने सतत जागृत राहून आपले लेखन करावे असे प्रतिपादन यावेळी बोलताना माधव कौशिक यांनी केले.

  आभार प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी मानले. यावेळी कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, राजीव बर्वे, विनोद कुलकर्णी, माधव राजगुरू, रामदास फुटाणे, डॉ. राजा दीक्षित यांच्यासह राज्यभरातून आलेले अनेक नामवंत साहित्यिक उपस्थित होते. 

 सुभाष कवडे यांचे बालकुमारांसाठी दोन बालकविता संग्रह, एक संस्कार कथासंग्रह आणि एक मुलांच्यासाठी संपादित पुस्तक प्रसिद्ध आहे. ते साने गुरुजी संस्कार केंद्राच्या माध्यमातून  गेली चोवीस वर्षे वाचन चळवळ मुलांच्या मध्ये रुजवण्यासाठी कार्य करीत आहेत. 
   या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक मान्यवरांनी सुभाष कवडे यांचे अभिनंदन केले आहे. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖