yuva MAharashtra मराठी चित्रपटांना न्याय द्यावा ; ....मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे दादरमध्ये आंदोलन

मराठी चित्रपटांना न्याय द्यावा ; ....मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे दादरमध्ये आंदोलन






मुंबई / दादर (वार्ताहार) :         02 MAY 2024

मंगळवार दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता हिंदमाता दादर येथील भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कै. दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आंदोलनाला सुरुवात करण्यांत आली. 

कोविड काळातील अपात्र चित्रपटांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यांना पात्र करून सरसकट अनुदानचे वाटप करावे. मराठी चित्रपट अनुदान परिक्षण न करता प्रोत्साहन म्हणून पहावे आणि सरसकट अनुदान दयावे. चित्रपट निर्माता यांना परफॉर्मन्स रॉयटी मिळावी. मराठी चित्रपटाना मिळणा-या अनुदान प्रस्तावातील जाचक अटी व शर्ती रद्द कराव्यात. चॅनेल्सने मराठी डब चित्रपट प्रदर्शित करणे बंद करावे त्याऐवजी मराठी चित्रपटांची थांबविलेली खरेदी पुन्हा सुरु करावी. गाण्यांच्या चॅनेल्सवर मराठी चित्रपटांची गाणी दाखविणे बंधनकारक करावे तसेच मराठी चित्रपट गाण्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा. मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांची नियामवली बदलावी, वी.पी. एफ चार्जेस घेऊ नये. क्युब, युएफओ व इतर डिजिटल चार्जेस मराठी चित्रपटांकरीता लूट करणारी आहे. ती लूट शासनाने कायदा करून थांबवावी. चित्रपटगृह चालविणे ही चित्रपटगृह मालकांची ही जबाबदारी असते. त्याची जबाबदारी फक्त निर्मात्यावर टाकू नये? शासनाच्या चित्रपट धोरण कमिटी तसेच अनुदान परिक्षण कमिटी वर निर्माता महामंडळाचे दोन प्रतिनिधी घेण्यात यावे. चित्रपटविषयक असणाऱ्या विविध समित्यांवर निर्माता महामंडळाला प्रतिनिधीत्व मिळत  नसल्यामुळे मराठी निर्मात्याच्या समस्यांकडे दूर्लक्ष होते. त्याकरीता अशाप्रकारच्या समित्यांवर निर्मात्यांचेच प्रतिनिधी शासनाने घेणे बंधनकारक करावे. त्याप्रमाणे शासकीय तरतूद करण्यांत यावी. अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्याचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी सांगितले.

 सदर आंदोलनामध्ये मराठी चित्रपट निर्माते, चित्रकर्मी, रंगकर्मी मोठयाप्रमाणात सहभागी झाले. त्यांनी सहयांच्या मोहीमे मध्ये सक्रीय भाग घेऊन आपला पाठींबा दर्शविला. सदर आंदोलन हे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यांत आले. अशी माहिती निर्माता महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी दिली.


 कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी आंदोलनाचे सूत्रसंचालन केले. सदर आंदोलन यशस्वी करण्याकरीता विनोद डवरे, विजय शिंदे, संजय दिक्षीत, डॉ. राकेश कुमार, महेश बनसोडे, डॉ. सुहास राणे, प्रविण भगत, श्री. रुपेश शिरोळे, रामचंद्र चव्हाण, अविनाश कुडचे, डॉ. कुंडलिक केदारी, अमर शेलार, गणेश पिल्लाई, अनिल होळकर, विजयभाऊ पाटील, संजय यादव, संजय कसबेकर, सुरेश सोनावणे आदी मंडळींनी मोलाचे योगदान दिले.


तसेच निर्माता महामंडळास पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक निर्माते आणि कलाकर्मी यांचेसह खा. अनिल देसाई, चंद्रशेखर पुसाळकर, श्रध्दा जाधव माजी महापौर, राजेंद्र बोडारे, विनोद डवरे, दिपक कदम, अशोक सुर्यवंशी, संगीता पिंगळे, रंजना पोवार, अल्ताफ पिरजादे,  अभिषेक फडे, महादेव साळोखे, गणेश तळेकर, विशाल सावंत, अमोल गायकवाड, रोहन सवणे, अनिता नाईक, रामचंद्र चव्हाण, संजय देवकर, सतिष  रणदिवे, पितांबर काळे, अर्चना दाणी, उमेश ठाकूर , दिलीप कांबळे, ललीता मांढरे, जनार्दन शिंदे, एम नटराज, माहीशंकर आगरवाल, चंद्रकांत जोशी, जयश्री पाटील, रूपेश शिरोळे, हेमलता शहा, डी एन इंगळे, किशोर गांगुर्डे, तुकाराम देवकर व इतर अनेक कलाकर्मी उपस्थित होते.

हेही पहा ----


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖