yuva MAharashtra शासनाकडून आलेला निधी हा नागरिकांचा पैसा आहे तो जपून वापरा ; ज्या कंत्राटदारांची कामे दर्जेदार नसतील अशा कंत्राटदाराना काळ्या यादीत टाका. ...आमदार अरुणअण्णा लाड यांनी कुंडल ग्रामपंचायत प्रशासनाला व सदस्यांना सुनावले खडे बोल.

शासनाकडून आलेला निधी हा नागरिकांचा पैसा आहे तो जपून वापरा ; ज्या कंत्राटदारांची कामे दर्जेदार नसतील अशा कंत्राटदाराना काळ्या यादीत टाका. ...आमदार अरुणअण्णा लाड यांनी कुंडल ग्रामपंचायत प्रशासनाला व सदस्यांना सुनावले खडे बोल.




कुंडल : वार्ताहर                 20 MAY 2024

शासनाकडून आलेला निधी हा नागरिकांचा पैसा आहे तो जपून वापरा, योग्य ठिकाणी वापरा यासाठी ज्या कंत्राटदारांनी कामे घेतली आहेत त्यांनी दर्जेदार कामे करा अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाका.

असे खडे बोल आमदार अरुणअण्णा लाड यांनी  कुंडल ग्रामपंचायत प्रशासनाला आणि सदस्यांना ऐकवले. ते कुंडल (ता.पलूस) येथे ग्रामसंसद बैठकीत बोलत होते. यावेळी क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार प्रमुख उपस्थित होते.

आमदार लाड म्हणाले, जे रेशनकार्ड खराब झाले आहे ते नवीन काढण्याचा कॅम्प लवकरात लवकर लावून जुन्याच उत्पन्नासह देण्यासाठी प्रशासनाला अर्ज करावेत. कचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करावा. सांडपाणी नियोजन प्रकल्प हा देशात पथदर्शक असल्याने तो कार्यक्षमरीत्या चालवावा काही अडचणी असल्यास आम्हाला सांगा आम्ही बघतो असे ते म्हणाले. गावातील ग्रामसचिवालयाची डागडुजी करावी. महिलांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून मंजूर व्यायामशाळेचे काम लवकरात साहित्य खराब होण्याअगोदर पूर्ण करावे, प्रशासक काळातील मंजूर कामांची फेरतपासणी करावी, वाढीव वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याची पावसाळ्यात अडचण होते तेथे सत्वर पाणी पोहोचवावे असे आदेश यावेळी देणेत आले.

लाड म्हणाले, मुळात ग्रामसंसद आढावा बैठक ही संकल्पना क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी आणली आणि तद्नंतर शासनाने ती पथदर्शक म्हणून राज्यभर राबविली त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबवा. गावातील पशुवैद्यकीय दवाखाना कित्तेक वर्षापासुन उद्धटनाशिवाय आहे ते काम मार्गी लावा, महिला सदस्यांनी गावातील महिलांसाठी बचत गट सुरू करून त्यांच्या समस्यांचे निवारण करा. जे ग्राहक पाणी पट्टी देत नाहीत त्यांना हप्त्यात भरायची सवलत द्या आणि तरीही हे भरत नाहीत त्यांचे कनेक्शन तोडा आशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती अरुण पवार, कुंडलिक एडके, अशोक पवार, नितीन लाड, सदस्य राहुल लाड, राहुल पवार, मनीषा लाड, शंकर पवार, किरण लाड, हनुमंत परळे, सुमन लाड, आकाकताई सोळवंडे, जितेंद्र कारंडे, सुनीता एडके, रेश्मा टेके, बसवेश्वर, सत्येश्वर, गणेशवाडी पाणी पुरवठा संस्थेचे सर्व पदाधिकारी, कुंडल विकास सोसायटीचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच इतर संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


ग्रामसंसद आढावा बैठकीत बोलताना आमदार अरुणअण्णा लाड, किरण लाड, शरद लाड, जयराज होवाळ, अर्जुन कुंभार, अरुण पवार आदी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖