yuva MAharashtra बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना अथवा पत्नीला कायमस्वरूपी नोकरीत समावेश करून घ्या..संजय कांबळे

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना अथवा पत्नीला कायमस्वरूपी नोकरीत समावेश करून घ्या..संजय कांबळे


बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे तालुका निहाय सुरू होत असलेल्या नोंदणी कार्यालयात, काम करण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार पाल्यांना अथवा पत्नीला त्यांच्या  शैक्षणिक पात्रतेनुसार  कायमस्वरूपी कामात किंवा मानधन तत्वावर नोकरीत समावेश करून घेण्यात यावे.

भाजप पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगार पुरविण्यासाठी तसेच विविध कल्याणकारी योजनांचे लाभ पुरविण्यासाठी ठेका देण्यात येऊ नये याचबरोबर भाजप पक्षाचे कार्यकर्ते यांना कल्याणकारी मंडळात काम करण्यासाठी कुठल्याही खाजगी कंपनीच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात येऊ नये केल्यास बंद पाडू.

... संजय कांबळे
संपर्क प्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांची मागणी.


                              VIDEO 

         पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया 






सांगली दि. २७ मे : आदरणीय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा शिष्टमंडळाने, मा. सहाय्यक कामगार आयुक्त सो, सांगली यांची प्रत्येक्षात भेट घेऊन बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर लेखी निवेदन दिले त्या निवेदनाद्वारे असे कळविण्यात येते की, 
श्रमिक कष्टकरी मोलमजुर बांधकाम कामगारांच्या सामाजिक व आर्थिक तसेच मुलांचे शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांना देण्यात येत आहेत. परंतु वास्तविक पाहता खऱ्या बांधकाम कामगारांना योग्य न्याय मिळताना दिसत नाही.  सद्या महाराष्ट्र राज्य शासनाने खाजगी कंत्राटी नोकर भरती बंद केले असल्याचे मंत्रीमहोदय यांनी जाहीर केले आहे. परंतु महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात मात्र खाजगी कंपनीला विविध प्रकारचे कल्याणकारी योजनांचा नावाने प्रायव्हेट कंपनीला आर्थिक फायदा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे वास्तव नाकारता येत नाही. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आहे की भाजप पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या कल्याणासाठी आहे ते समजले जाने मुश्किल झाले आहे. 

सद्या 'S2' या खाजगी कंपनीला, विद्यमान कामगार मंत्री यांच्या नात्यातील लोकांनाच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगार पुरविण्यासाठी ठेका दिला असल्याचे कळते, तसेच मंडळात काम करणारे हे भाजप पक्षाचे कार्यकर्ते असल्याने सर्वसामान्य गरीब कष्टकरी बांधकाम कामगारांना योग्य न्याय देत नसल्याचे स्पष्ट पणे दिसत आहे. पक्षाचे कार्यकर्ते असल्याने गरीब बांधकाम कामगारांनावर मज्जाव करीत आहेत. याचबरोबर शासकीय कामगार अधिकारी यांना ही हे खाजगी कंपनीचे कामगार उर्मट भाषेत वाद घालताना दिसत आहेत. त्यांना कामगार मंत्री यांचे पाठबळ असल्याचे खाजगी मध्ये बोलले जात आहे. बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच मंडळाच्या माध्यमातून दिले जात आहे. सदर भांडी संच पुरवठा आणि वितरण हे भाजप पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते करताना दिसत आहेत.  लेबल डिपार्टमेंटला त्यांच्या सर्व स्तरांवर, भांडी संच वितरणाच्या संख्या नुसार टक्केवारीवर मंडळाच्या माध्यमातून भांडी वितरण कंपनी मार्फत ठराविक रक्कम अदा केली जात असल्याचे कळते त्यामुळे लेबर डिपार्टमेंट मुग गिळून गप्प बसले असल्याचे दिसून येत आहे. 'हाम करे सो कायदा' असे सुरू आहे. 

मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. लेबर डिपार्टमेंटला, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कामकाज पाहण्यासाठी अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्या कामाचा मोबदला मिळत नाही. वास्तविक पाहता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कामा नुसार ठराविक रक्कम लेबर डिपार्टमेंट मधील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात यावी. यामुळे अधिकारी व कर्मचारी अधिक जबाबदारीने व जोखीमदारीने आपले कर्तव्य पार पाडतील.
या पूर्वी , वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली संघटने मार्फत 'कामगार मंत्री' व 'कामगार सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई' यांना आम्ही लेखी निवेदना मार्फत कळवले होते की, कामगार मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या  कार्यालयात नोंदणीकृत कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार पाल्यांना व त्यांच्या पत्नीला शैक्षणिक पात्रतेनुसार महामंडळाच्या कार्यालयात कायमस्वरूपी कामात किंवा मानधन तत्वावर समावेश करून घेण्यात यावे.

 सध्या कंत्राटी पद्धतीने भरलेल्या मंत्र्यांच्या सगेसोयरे, कार्यकर्ते आणि चेल्याचपाट्या मुळे कामगार मंत्र्यांचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात वाढते हस्तक्षेप हे बांधकाम कामगारांच्या पथ्यावर पडणारे आहे. सद्या पहाता, कामगार मंत्री यांच्या भाजप कार्यालयातूनच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कामकाज चालू आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधकाम कामगारांच्या हक्काचा पैसा जर असे कार्यकर्ते, सगेसोयरे आणि चेल्याचपाटे पोसण्यासाठी वापर जर होत असेल तर बांधकाम कामगारावर फार मोठा अन्याय आहे. कामगाराच पोरं उपाशी अनं मंत्री आणि अधिकारी तुपाशी अशी गत प्रत्यक्षात झाली आहे. 

 
सांगली, मिरज तालुका तसेच इतर तालुक्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात तालुका निहाय कार्यालय चालविण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक तसेच विद्यमान कामगार मंत्री यांचे नजिकचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या मध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे कळते आहे. यामुळे बांधकाम कामगारांच्या हक्काची माणसे तर वंचित राहणार असतीलच तर कल्याणकारी मंडळ कसे म्हणायचे. सध्या महामंडळाच्या कारभार कसा सुरु आहे हे सर्वांना माहिती आहे. तर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे कामकाज विनासायास पार पडायचे असल्यास नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांनाच कार्यालयीन कामकाजात समावेश करण्यात यावा. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना अथवा पत्नीला मंडळाच्या कार्यालयीन कामकाजात रुजू करून घेतल्याने मंडळाचे कल्याणकारी मंडळ ह्या नावाचे सार्थक होईल. अन्यथा आम्हाला, बांधकाम कामगारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या मार्फत लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विद्यमान कामगार मंत्री यांच्या कार्यालयासमोर आणि सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण करावे लागेल याची प्रामुख्याने नोंद घ्यावी व होणाऱ्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य शासन तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे जबाबदार राहणार आहे. असा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र राज्य महासचिव मा.प्रशांत वाघमारे साहेब, तसेच सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे (सर), कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे,संगाप्पा शिंदे,अरूण नाटेकर, गणेश मासाळे, पृथ्वीराज लोंढे, बंदेनवाज राजरतन,साकिब पटेल, प्रदिप मंचद, यल्लाप्पा बनसोडे, नूरसाब गडीकर, जावेद आलासे, इसाक सुतार, विक्रांत गायकवाड यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖