कुंडल:वार्ताहर २७ मे २०२४
यंदा क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाणा 25 लाख शुद्ध ऊस रोपे तयार करणार असल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केले.
ते कारखाना नर्सरीमध्ये तयार केलेल्या ऊसरोपे तयार करण्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी टिशू कल्चर रोपांचे ही वितरण शुभारंभ करण्यात आला.
शरद लाड म्हणाले, ऊस लागणीसाठी रोपांचा वापर केल्यामुळे एकरी उत्पादनात ८ ते १० मे.टनाची वाढ होत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस रोपांची लागवडीत वाढ झालीय आहे. परिसरात एकूण ऊस रोपांच्या लागणीत सुमारे ५० टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर क्रांती कारखान्याच्या ऊसविकास योजनेतून तयार केलेल्या रोपांचा समावेश असतो.
ते पुढे म्हणाले, पहिल्या गाळप हंगामापासूनच योग्य बियाणे मिळावेत म्हणून आमदार अरुणअण्णा लाड सदैव प्रयत्नात आहेत. कारण त्रुटी असलेल्या बियानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतंच शिवाय गाळप हंगामावर ही त्याचा परिणाम होऊन राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि त्या अनुषंगाने देशाच्या सर्वांगीन विकासासाठी आम्ही हा करत असलेला हा छोटासा प्रयत्न, मोठा बदल घडवेल आणि शेतकर्यांच्यात प्रयोगशीलता आणेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
"क्रांतीमार्फत एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी दरवर्षी विविध ऊसविकास योजना राबविल्या जातात. यामध्ये ऊस लागवडीसाठी आवश्यक सर्व निविष्ठा व मजूर खर्चासाठी अर्थसहाय्य याचा समावेश आहे. काही शेतकरी कांडी पध्दतीने ऊसाची लागण करतात तथापी कांडी ऐवजी रोप पध्दतीने लागण केल्यास तुटाळी सांधण्याचा खर्च वाचतो, पाण्याची व मजूर खर्चात बचत होते,याशिवाय रोप लागणीमध्ये एकाचवेळी येणारे फुटवे व त्याची समान वाढ यामुळे उत्पादनात वाढ होते.
क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यात ऊस रोपे तयार करणेचा शुभारंभ अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक सुकुमार पाटील, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, दिलीप थोरबोले, जितेंद्र पाटील, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖