उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला की सर्वत्र बाजारपेठांमध्ये आंब्याचा घमघमाट पसलेला असतो. चवीला गोड तसेच रसाळ असणाऱ्या आंब्याला जगभरात प्रचंड मागणी आहे.
पण आंब्याचा गर खाऊन लोक त्याची कोय फेकून देतात. परंतु आंबाचे शरीराला जितके फायदे आहेत, तितकिच त्याची कोयही गुणकारी मानली जाते.
आंब्याच्या कोयमध्ये अनेक नैसर्गिक घटक आढळतात. व्हिटॅमिन, मिनिरल्स तसेच अँटि-ऑक्सिडंट्स गुणांनी परिपूर्ण असणारी आंब्याची कोय शरीरासाठी प्रचंड फायदेशीर आहे.
केसांतील कोंडा कमी होतो-
केसांमधील कोंडा ही एक मोठी समस्या आहे. फक्त हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यात देखील केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवू शकते.
आंब्याच्या कोयीपासून बनवलेलं पेस्ट केसातील कोंडा नाहिसा करण्यासाठी उपयुक्त ठरतं. हे पेस्ट केसांवर तसेच टाळूवर हळूवारपणे लावावं. त्यानंतर काही वेळानंतर केस पाण्याने धुवावे. हे पेस्ट केसांना लावल्यामुळे केस मऊ आणि चमकदार बनतात.
१) सुरुवातीला आंब्याच्या काही कोय एकत्र करून घ्या.
२) या कोयींच्या वरचा भाग पूर्णपणे काढून त्याच्या आतील पांढरी बी काढा.
३) या बिया मिक्समध्ये बारीक करून घ्याव्या.
४) हे मिश्रण रायच्या तेलामध्ये एकजीव करावं आणि ही पेस्ट केसांवर अप्लाय करावी.
कोलेस्ट्रोल कंट्रोल होण्यास मदत -
आंब्याच्या कोयीमुळे शरीरातील बॅड कोलोस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. आंब्याच्या कर्नेल पावडरचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहते. या कोयीच्या पावडरपासून शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते, असं तज्ञ सांगतात.
यासाठी आंब्याची कोय नीट वाळवून बारीक करून त्याची बारीक पावडर बनवा. एक ग्लास पाण्यात एक चम्मच पावडर मिसळून त्याचं सेवन करावं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
वजन होईल कमी-
वजन कमी करण्यासाठी आंब्याची कोय उपयुक्त ठरते. यामुळे मेटाबॉलिक रेटमध्ये वाढ होऊन, पोटावरील चरबी कमी होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖