पलूस दि.१७ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे व शिष्टमंडळाने पलूस तालुक्यातील दुधोंडी गावाला बंद असणाऱ्या एस.टी.बसेस तात्काळ सुरू करण्यात याव्यात त्याचप्रमाणे पलूस आगारा मध्ये महाराष्ट्र शासनाने दहा गाड्या वाढीव द्याव्यात अशा मागणीचे निवेदन पलूस परिवहन आगार प्रमुखास आरपीआयच्या वतीने देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआयच्या वतीने विशालभाऊ तिरमारे यांनी दिला. यावेळी आरपीआय मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर, विधानसभा उपाध्यक्ष शितल मोरे, यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन म्हटले आहे की महा. परिवहन मंडळाकडून पलूस तालुक्यातील जनतेला ये - जा करण्यासाठी एस.टी. बसेसची सोय केली जाते. परंतु गेली दोन-तीन महिने दुधोंडी गावाला कोणत्याही प्रकारची एस.टी. बसेसची सुविधा सुरू नाही. त्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक महिला,विद्यार्थी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची ज्येष्ठ महिला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून नागरिकांच्या साठी दिल्या जाणाऱ्या सुविधा पुरविण्यास आपले कार्यालय अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे तरी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपणास निवेदनाद्वारे मागणी करू इच्छितो की दुधोंडी गावाला तसेच पलुस तालुक्यातील आसपासच्या ज्या खेडेगावात बसेस बंद असतील त्या सर्व बसेस पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात याव्यात. यापुढील काळात जनतेला वेठीस धरल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या विरोधात उग्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल तरी तात्काळ एस.टी. बसेस सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा.
हेही पहा ----
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖