भिलवडी दि. २९ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पुणे येथे सुरू असलेल्या सोळा वर्षाखालील इन्विटेशन क्रिकेट लीग मध्ये विजय वावरे क्रिकेट ॲकॅडमी पलूस - भिलवडी चा खेळाडू प्रणव शिंदे याने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 बळी मिळविले. सांगली जिल्हा संघाने. हा सामना निर्णायक जिंकला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार व सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मा.संजय बजाज यांनी प्रणव शिंदे याचे विशेष कौतुक केले
प्रणव शिंदे याला सांगली क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष मा. संजय बजाज साहेब, ज्येष्ठ प्रशिक्षक सागर पेंडूरकर, पोलाईट क्रिकेट क्लब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
प्रणव शिंदे हा Bcci - level 1 प्रशिक्षक विजय वावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस - भिलवडी येथील क्रिकेट अकॅडमी मध्ये कसून सराव करत आहेत.
हेही पहा ----
https://youtu.be/ygSTG-kxWQA?si=I1USJexkXFT_3_9बोल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖