yuva MAharashtra सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन

सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन




 

            सांगली, दि. 24 (जि. मा. का.) :   राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येते.  तसेच  संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर 1987 मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 

            या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्यायाचे महत्व सांगणे, व्यसनमुक्ती बाबत प्रबोधन करणे या अनुषंगाने  जाणीव निर्माण करणे व माहिती देण्यासाठी बुधवार, 26 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 




 या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त  जयंत चाचरकर यांनी केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖