पलूस दि. ११ : आंधळी ता. पलूस येथे आज मंगवार दि. ११ जून रोजी सांगली मिशन सोसायटी व ग्रामपंचायत संचलित आस्था समाज सक्षमीकरण केंद्र आंधळी व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर हायस्कूल,आंधळी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्यसनमुक्ती दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
तसेच गावातील मुख्य रस्त्यावरुन जनजागृती फेरी काढून जनजागृती पर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
आंधळी गावचे सरपंच अमित चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्रीफळ वाढवून व आभिवादन करुन व्यसनमुक्ती जनजागृती फेरीला सुरुवात करण्यात आली.
लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. 23 मे 2024 ते 6 जून 2024 अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता. यामुळे हा कार्यक्रम ३१ मे ऐवजी आज दि. ११ जून रोजी घेण्यात आला असे यावेळी आयोजकांनी सांगितले.
पथनाट्याचे सादरीकरणातून व्यसनमुक्तीचा संदेश
गावातील श्री बालगणेश बालसंसद गट व स्वराज्य बालसंसद गटातील मुलांनी व्यसनमुक्ती या विषयावर जनजागृती पर पथनाट्य गावातील नागरिकांसमोर सादर केले. या पथनाट्याच्या माध्यमातून गावातील मुलांनी गावकऱ्यांना व्यसन केल्यामुळे वैयक्तिक शरीरावर होणारे परिणाम, व्यसनांचे तोटे,त्यामुळे कुटुंबावर, मुलांच्या मनावर व समाजात प्रतिष्ठावर होणारे दुष्परिणाम या विषयावर प्रबोधन केले. व्यसनामधून मुक्त होण्यासाठी, व्यसन सोडून मनावर ताबा ठेवण्यासाठी पुन्हा व्यसन करण्याची इच्छा होऊ नये म्हणून लहान मुलांनी पथनाट्य मधून योगासन, प्राणायाम, ध्यान धारणा व आहाराचे महत्व गावकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न पथनाट्य मधून केला.
व्यसनमुक्तीचे विविध नारे देत गावातून जनजागृती फेरी
पथनाट्य झाल्यानंतर आंधळी गावातील प्रमुख मार्गांनी व्यसनमुक्ती करण्यासाठी "आज नाही आता सिगरेट करू बेपत्ता" दारू सोडा आयुष्य वाचवा, मादक द्रव्याची गोळी करी जीवनाची होळी, व्यसनाचा करू अधिकार विकास योजनांचा लाऊ हातभार, व्यसन म्हणजे जिवंत मरण व्यसन सोडा फुलेल जीवन, नसा पासून रहा दूर जीवन सुख मिळवा भरपूर असे प्रबोधनात्मक संदेश व व्यसनमुक्तीचा नारा देत मुलांनी जनजागृती फेरी काढली.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच अमित चव्हाण, आंधळकर हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहिते सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , दिव्यांग क्रीडा असोशियन सांगली चे सचिव सुदेश माने, संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत व गावातील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोहिते सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन आस्था समाज सक्षमीकरण केंद्राचे वैशाली जाधव,शुक्राना शिकलगार व संग्राम घोरपडे यांनी केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖