कराड दि. २ जून : दहावी - बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवायलाच हवी. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे त्यांना प्रोत्साहन देणे आहे. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच क्रीडा क्षेत्रात आवड निर्माण करून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी लिबर्टी मजदूर मंडळाने मार्गदर्शन करावे. असे प्रतिपादन पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य, जेष्ठ पत्रकार गोरख तावरे यांनी केले.
आरोग्य धनसंपदा मित्र परिवाराच्या वतीने दहावी - बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोरख तावरे तर प्रमुख अतिथी म्हणून अविनाश महिंद्रकर उपस्थित होते.
राजवर्धन संदिप महामुनी, गौरव सुभाष गुरुपादगोळ, राजवर्धन नितीन जगताप, विभास जय सोनवणे, आशुतोष अरुण रोमन, विशाखा परशुराम आरेकर, साई विनायक पवार, स्नेहा अविनाश महिंदकर, आर्या नितीन जगताप, वेदांत जितेंद्र जाधव या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
शशिकांत शिंदे, परशुराम आरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संदीप महामुनी यांनी केले. सूत्रसंचालन वैभव भोसले यांनी केले तर आभार एस. व्ही. शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. तानाजी काकडे, सतीश सूर्यवंशी, अशोक पटेल, विशाल बसुगडे, नितीन जगताप, तेजस कुंभार, यश यादव, तेज शहा, अमित शिंदे, संग्राम सूर्यवंशी, सलीम मुल्ला, अक्षय गाडे, विनोद कसबे, केदार खांडे, दीपक फडतरे, विनायक पवार उपस्थित होते.
हेही पहा ----
https://youtu.be/Ziv2E03ne0M?si=uwTJIh-eOM9WkTLF
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖