yuva MAharashtra इस्लामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोखर्णी येथे करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी... जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन ; ....डी. पी. आय. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भांडाफोड आंदोलनाचा इशारा...

इस्लामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोखर्णी येथे करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी... जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन ; ....डी. पी. आय. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भांडाफोड आंदोलनाचा इशारा...













वाळवा/पोखर्णी :     दि. २० जून २०२४

सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील इस्लामपूर सार्वजनिक बांधकाम विभाग  अंतर्गत पोखर्णी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या गटारीच्या व स्मशानभूमी च्या निकृष्ट कामांची चौकशी होवून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच संबंधितांच्या प्रापर्टीची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी डी. पी. आय. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दि. २१/०६/२०२४ रोजी पासून भांडाफोड आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डी. पी. आय पक्षाचे जमीन, झोपडी हक्क अभियान, राज्य प्रमुख अशोकराव वायदंडे व पदाधिकारी यांनी दिली आहे.




    डी. पी. आय पक्षाचे जमीन, झोपडी हक्क अभियान, राज्य प्रमुख अशोकराव वायदंडे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीशराव लोंढे , जिल्हा संघटक अरुण सकटे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
    या निवेदनात असे म्हटले आहे की,
पोखर्णी ता. वाळवा येथील पी.डब्ल्यू. च्या रस्त्याच्या बाजूचे गटर बांधकाम इस्टीमेटप्रमाणे होत नाही व ते काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याचबरोबर मातंग समाज स्मशान भूमी मध्ये निवारा शेडचे काम सुरू आहे. ते सुध्दा निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या संदर्भात दि.२८ एप्रिल २०२४ त्यानंतर दि.१६ मे २०२४ रोजी इत्लामपूर बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. परंतु आष्टा विभागाचे शाखा अभियंता मुल्ला साहेब यांनी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरू आहे. याचे कारण पुढे करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यानंतर इस्लामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजि. स्वप्नील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सुध्दा उडवा उडवीची उत्तरे देऊन धमकी देत आहेत. तुम्हाला काय करायचे ते करा. माझ्या विरुध्द कोणाकडे ही तक्रार करा. माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. माझ्या ठेकेदाराने चांगल्या दर्जाचे कामे केली आहेत. परंतु लोकसभा निवडणूकीची आचार संहिता सुरू असताना ही कामे कशी काय सुरू केली आहेत. याचा खुलासा स्वप्नील पाटील यांनी उध्दटपणाची भाषा बोलून जाणीवपूर्वक मागासवर्गीय कार्यकत्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत, स्वप्नील पाटील यांनी जाणीवपूर्वक अनेक वेळा भेटण्यासाठी ऑफिस मध्ये असतानासुध्दा भेट घेतलेली नाही व आमची तक्रार सुध्दा ऐकून घेतली नाही अशा या उध्दटपणे भाषा करणारे स्वप्नील पाटील व त्यांचे ज्या ठेकेदाराशी टक्केवारीशी कनेक्शन जोडले आहे. अशा या सर्व बाबींची व त्यांच्या प्रापर्टीची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी, त्याचबरोबर आष्टा उपविभागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक कामे सुरू आहेत. ती सुध्दा पुर्णपणे निकृष्ट दर्जाची सुरू आहेत याची देखील चौकशी व्हावी. या मागणीसाठी डी. पी. आय. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दि. २१/०६/२०२४ रोजी पासून भांडाफोड आंदोलन करण्यात येणार आहे. याची शासन व प्रशासन यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. 
    आंदोलना दरम्यान उद्भवणाऱ्या  परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहतील याची दक्षता घ्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖