BANNER

The Janshakti News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी







        सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते. सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन यांचे संयुक्त औचित्य साधून समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्यायाचे महत्व सांगणे, व्यसन मुक्तीबाबत प्रबोधन करणे या अनुषंगाने जाणीव, माहिती देण्यासाठी आज सांगली शहरात समता दिंडी उत्साहात काढण्यात आली.



            एस.टी.स्टँड समोर सांगली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर व ‍जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देवून समता दिंडीला सुरूवात करण्यात आली. 


ही समता दिंडी एस.टी.स्टॅण्ड सांगली येथून निघून राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौक सांगली येथे या समता दिंडीची सांगता झाली. या समता दिंडीत विठ्ठल काळे, समाज कल्याण विभागाचे व महामंडळांचे अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖