सांगली दि. 17 (जि.मा.का.) : यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीत मदत कार्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक नुकतेच दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सन 2019 व 2021 मधील महापुराचा अनुभव पाहता तसेच हवामान खात्याकडून दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार संभाव्य पूर स्थितीत मदत व बचाव कार्यासाठी राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफ चे एक पथक पाठविण्यात आले आहे.
या पथकामध्ये पथक प्रमुख महेंद्रसिंह पुनिया यांच्यासह एकूण ३० जवान असून त्यांच्याकडे बोट, लाईफ जॅकेट, लाइफ रिंग इत्यादी अनुषंगिक साहित्य उपलब्ध आहे. हे पथक ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार असून पथकामार्फत जिल्ह्यामध्ये जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖