सांगली दि. १३ : नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणारे भांडीसंच कॅम्प मागणी करणारे पत्र हे नोंदणीकृत कामगार संघटनेच्या व्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष,संस्था, यांच्या लेटरहेडवर प्राप्त यादी मान्य न करता प्रतिबंधित करावे.....
बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वितरण करणारे कंपनीचे काही कर्मचारी तसेच त्यांच्या संपर्कात असणारे एजंट हे बांधकाम कामगारांच्या कडून भांडी संच देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची उकळनी करून भांडीसंच वितरण करीत आहेत, अशा व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करावे व नोंदीत बांधकाम कामगारांची होणारी फसवणूक टाळावे.....
भांडीसंच वितरण करण्याऱ्या कंपनीचे कर्मचारी अधिकारी यांना संबंधित कंपनीची ओळखपत्र, काम करण्याचे आदेश पत्र आपल्या कार्यालया कडुन प्रदान करण्यात यावेत......
सहाय्यक कामगार आयुक्त यांना लेखी निवेदन
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने, मा. सहाय्यक कामगार आयुक्त सो, सांगली यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून श्रमिक,कष्टकरी, बांधकाम कामगारांना रोजच आपल्या कुटूंबाचे दैनंदिन उदर निर्वाह करण्यासाठी मरणा सोबत संघर्ष करावे लागते यामुळे त्यांची अवस्था खूपच दयनीय आहे त्यांना वरचेवर एका गावांतून दुसऱ्या गावात जाऊन काम करण्यासाठी राहावे लागते, त्यांचे जेवणाचे हाल होवू नये म्हणून त्याना उपयोगी अशी तीस भांड्यांचा संच दिला जात आहे. वास्तविक पाहता सदरची योजना ही कामगारांसाठी कल्याणकारी आहे. या आधी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गर्दी करून भांडी संच वितरण केले जात होते परंतु नागपूर जिल्हा मंत्रीमहोदय यांच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजप पक्षाचे नेत्यांनी मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी करून भांडी वितरण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमात धक्काबुक्की चेंगराचेंगरी होऊन महिला कामगाराचा मृत्यू झाला आहे. परत अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून सद्या तालुका निहाय कॅम्प देण्याचे नियोजन सुरू आहे असे कळते, त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्तसो यांच्या कार्यालयात काही नोंदणीकृत कामगार संघटनेच्या वतीने भांडी संच मागणी करणारे निवेदन व अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुसार आपल्या कार्यालयात प्राप्त झालेल्या रजिस्टर अनुक्रमणिका नंबर प्रमाणे कॅम्प देण्यात यावेत. अधून - मधून अथवा राजकीय दबाव आणून प्रथम प्राधान्य देण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच काही राजकीय पक्ष, संस्था यांच्या लेटरहेडवर भांडी संच मागणीसाठी निवेदन व अर्ज आपल्या कार्यालयात प्राप्त झाले आहेत. हे सर्व कामगार कायदा धोरणाच्या विरोधात आहे. राजकीय वरदहस्त असणारे एजंट, राजकीय हस्तक्षेप आणून कार्यालयीन प्रक्रियेत दबाव आणताना दिसत आहे. वास्तविक पाहता नोंदणीकृत कामगार युनियन अथवा स्वतः नोंदीत कामगार यांच्या व्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी दाखल केलेले अर्ज निवेदन विचारात घेतले जाऊ नयेत, त्यांना भांडी वितरण करणारे कॅम्प देऊ नये. याचबरोबर भांडी वितरण करण्यासाठी उपलब्ध असणारे कर्मचारी हे भाजप या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे दिसून येत आहेत. यावरून असे चित्र स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालवले जात आहे. भांडी संच वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी यांना संबंधित कंपनीचे काम करीत असल्याचे ओळखपत्र तसेच काम करण्यासाठीचे आदेश पत्र देण्या संबंधात आपले आदेश व्हावे.
याचबरोबर नोंदीत बांधकाम कामगारांना भांडी संच वितरण करणाऱ्या कंपनीचे काही कर्मचारी हे एक बांधकाम कामगारांला भांडी संच देण्यासाठी 300/- रूपये तसेच सुरक्षा साहित्य देण्यासाठी 200/- रूपये मागत आहेत. असे पैसे एजंटांचा माध्यमातून घेऊन, परस्पर भांडी संच वितरण कॅम्प लावत आहेत असे कळते. पुढे जाऊन हे एजंट बांधकाम कामगारांना भांडी संच मिळवून देण्यासाठी प्रत्येकी 1500/- ते 2000/- रूपये घेऊन भांडी संच देत असल्याचे कळते. असे निर्दशनास असल्यास सदर भांडी संच वितरण कंपनीचे बिल अदा करण्यात येऊ नयेत.
अशा व्यक्तीच्या वर कायदेशीर कारवाई करावी.
अशा व्यक्तींवर कडक निर्बंध लादण्यात यावेत. धोरणात्मक निर्णयानुसार नियोजन आखावे. तसे स्थानिक वृत्तपत्रातून आणि वृत्त वाहिनीच्या माध्यमातून प्रसिद्ध करावे.
त्याची प्रत कामगारांच्या माहितीकरिता आपल्या कार्यालयात दर्शनीय ठिकाणी लावण्यात यावी.
नोंदीत बांधकाम कामगारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात.
अशा आशेचे निवेदन दिले आहे.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, शिवाजी गुळवे, संगाप्पा शिंदे, बंदेनवाज राजरतन,सागर आठवले, यल्लाप्पा बनसोडे, असलम मुल्ला, विठ्ठल मरगळे, दादासाहेब सदाकळे, विक्रांत गायकवाड, जावेद आलासे, इसाक सुतार यांच्या बरोबरच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖