सांगली, दि. 2 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, विटा, कवठेएकंद (ता. तासगांव), वांगी (ता. कडेगांव), बांबवडे (ता. पलुस) व जत येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला- मुलींच्या शासकीय निवासी शाळा सुरू आहेत. कवठेमहांकाळ, विटा, कवठेएकंद, बांबवडे व जत या निवासी शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के तर शासकीय निवासी शाळा वांगी चा निकाल 95 टक्के लागला आहे. शासकिय निवासी शाळेतील मुलां-मुलींनी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांचा गौरव होत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता जास्तीत जास्त इच्छुक व गरजु विद्यार्थी-विद्यार्थीनींनी शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यावा. यासाठी संबधित मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
जत येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. प्रणाली पोळ 93.60 टक्के, कु. अनुराधा कांबळे 75 टक्के व कु.राधिका जाधव 75 टक्के, बांबवडे ता. पलुस येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. कौतुका लांडगे 86.40 टक्के, कु. संस्कृती बनसोडे 82.20 टक्के व कु. प्राची माने 82 टक्के, कवठेमहांकाळ येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. सिध्दार्थ वाघामरे 86.80 टक्के, कु.तेजस साबळे 77.60 टक्के व कु. धिरज डोंगरे 76.80 टक्के, वांगी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. वेदांत पाटोळे 79.80 टक्के, कु. मयुर कांबळे 77.40 टक्के व कु. ईश्वर कांबळे 73.60 टक्के, विटा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. ओंकार जाधव 76.40 टक्के, कु. विकास पुकळे 72.60 टक्के व कु. ऋतुराज वाघमारे 71.80 टक्के, कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. योगीराज आवळे 73.20 टक्के, कु. विश्वजीत काकडे 71.60 टक्के व कु.चैतन्य अवघडे 71 टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला असून या सहा शाळांनी इ. 10 वी मध्ये घवघवीत यश मिळवण्याची परंपरा कायम राखली असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
गुणवंतांचे समाज कल्याण पुणे विभाग पुणे चे प्रादेशिक उपायुक्त बाळसाहेब सोळंकी, समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, सर्व मुख्याध्यापक, सर्व सहा. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇
https://youtube.com/@thejanshakatinews5707
Portal Link
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖