सांगली दि. 7 (जि.मा.का) : सांगली पाटबंधारे विभाग सांगली येथे दि. 1 जून 2024 पासून मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पूर नियंत्रण कक्ष दि. 1 जून 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अखंडित कार्यरत ठेवण्यात येत असून माहितीसाठी पूरनियंत्रण कक्षामधील 0233-2301820, 0233-2302925 या दूरध्वनी व 9307862396 भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.
पूर नियंत्रण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी पाटबंधारे उपविभाग सांगलीचे सहाय्यक अभियंता मो.रा. गळंगे, पाटबधारे उपविभाग आष्टा च्या सहायक अभियंता योगिता थोरात व पाटबंधारे उपविभाग मिरज व इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी सी.बी. यादव यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पूर नियंत्रक उपप्रमुख व पूर नियंत्रण कक्ष अधिकारी नियुक्त
यंदाच्या पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी जलसंपदा विभागामार्फत जिल्हा पूर समन्वय अधिकारी व कृष्णा मुख्य खोऱ्यातील पूर नियंत्रक उपप्रमुख ( कृष्णा मुख्य खोरे कोयनेसहीत उपनद्या) व आंतरराज्य पूर नियंत्रण समन्वय अधिकारी (अलमट्टी) म्हणून सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चं. हि. पाटोळे यांची नियुक्ती केली आहे. तर सांगली जिल्हा पूर नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता श्रीमती ज्योती देवकर यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇
https://youtube.com/@thejanshakatinews5707
Portal Link
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖