yuva MAharashtra विजय जाधव यांच्या शिवार कादंबरीस महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ल.ठोकळ पुरस्कार

विजय जाधव यांच्या शिवार कादंबरीस महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ल.ठोकळ पुरस्कार




पलूस /भिलवडी दि. २ जून : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने बुरुंगवाडी ता.पलूस येथील
प्रसिद्ध कथा/कादंबरीकार श्री.विजय जाधव यांच्या  शिवार या कादंबरीस ग. ल.ठोकळ पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माधव कौशिक (ज्येष्ठ साहित्यिक व अध्यक्ष, साहित्य अकादमी, नवी दिल्ली) यांचे हस्ते व ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे अध्यक्षतेखाली एस.एम.जोशी हॉल पुणे येथे पुरस्कार  वितरण सोहळा संपन्न झाला.



विजय जाधव यांना पुरस्कार प्रदान करताना माधव कौशिक, डॉ.रावसाहेब कसबे,प्रा.मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार आदी मान्यवर..

मानपत्र,शाल,श्रीफळ,रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.विजय जाधव ब्रह्मानंद विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक असून नाती रक्ताची हा कथासंग्रह,कृष्णाकाठच्या महापुराचे वास्तव मांडणारी पाऊसकाळ ही प्रसिद्ध कादंबरी,तर क्षारपड जमिनीच्या प्रश्नावरील 
शिवार ही कादंबरी प्रसिद्ध आहे.विनोदी कथाकथन, व्याख्यानांच्या माध्यमातून समाजमनावर विचार आणि संस्काराची पेरणी करण्याचे कार्य ते अविरतपणे करीत आहेत.
यावेळी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष अध्यक्ष प्रा .मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार,अंजली कुलकर्णी,विनोद कुलकर्णी,डॉ.पुरुषोत्तम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे ग्रामस्थ,माजी विद्यार्थी व साहित्यिक परिवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖