कुंडल : वार्ताहर
कुंडल दि.५ : कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरती जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते पार पडला.
क्रांती कारखान्यावरती जागतिक पार्यावरन दिनानिमित्त वृक्ष लागवड करताना अध्यक्ष शरद लाड आणि मान्यवर.
यावेळी शरद लाड म्हणाले, वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज झाले आहे, पृथ्वीवरील जीवश्रुष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यासाठी माणसाची प्राणवायूची गरज भागवायची असेल तर वृक्ष लागवड आणि संवर्धन केले पाहिजे.
कारखान्याने आमदार अरुणअण्णा लाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजवर हजारो वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन ही केले आहे. परंतु यावर आम्ही थांबलो नाही हि वृक्ष लागवडीची परंपरा आम्ही नेहमी चालू ठेवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, वीरेंद्र देशमुख, विलास जाधव, दिलीप पार्लेकर, किरण पाटील, उदय लाड, सागर पाटील, यांच्यासह कर्मचारी उपास्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖