मंगळवेढा दि. १२ : महा व्यवसाय शिक्षण डिजिटल ऑनलाइन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था संचालित समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र मंगळवेढा या केंद्रात मे 2024 मध्ये घेतलेल्या मोंटेसरी शिक्षिका या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून समर्थ प्रशिक्षण विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यामध्ये मोंटेसरी शिक्षिका परीक्षेत मध्ये उज्वला सतीश दत्तू यांचा 88.50% गुण प्राप्त करून विशेष योग्यता श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक आला.
दिपाली अतुल कांबळे 76.75% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक व रहिशा दाऊद मुलाणी व धनश्री बाळासो गवळी 76% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
उज्वला दत्तू या प्रयामा पूर्वप्रथमिक विदयालय या संस्थेत सहाशिक्षिका म्हणून अध्यापणाचे कार्य करीत असून संस्थेने त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
समर्थ प्रशिक्षण केंद्र शिशुविहार मंगळवेढा येथे अंगणवाडी शिक्षिका ,सुपरवायझर, अंगणवाडी मदतनीस, पत्रकारिता, ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग, शिवणकाम या विषयाच्या अध्यापनाचे कार्य होत असते.
प्रशिक्षण केंद्राची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. यामध्ये योग्य मार्गदर्शन व प्राध्यापकाचे अध्यापन कौशल्य याचाही मोठा सहभाग आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे,संस्थेचे उपाध्यक्ष महेश दत्तू,केंद्रसमन्वयक दिनेश मुदगुल,प्राचार्या सोनिया कांबळे, सहशिक्षका सुप्रिया जमदाडे खजिनदार मेघश्याम सुरवसे,संचालक इकबाल पाटील,शरदचंद्र पवार,लता पाटील यांचेसह पालकांनी यशाबद्दल अभिनंदन केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖