yuva MAharashtra T20 विश्वचषक 2024 : दक्षिण आफ्रिकेला हरवून भारत बनला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड चॅम्पियन

T20 विश्वचषक 2024 : दक्षिण आफ्रिकेला हरवून भारत बनला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड चॅम्पियन





शनिवारी (२९ जून) टी२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


भारताने 20 षटकात 7 विकेट गमावत 176 धावा केल्या. विराट कोहलीने 76, अक्षर पटेलने 47 आणि शिवम दुबेने 27 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिच नोरखिया यांनी 2-2 बळी घेतले. मार्को यानसेन आणि कागिसो रबाडा यांनी 1-1 विकेट घेतली. रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. एडेन मार्करामनेही प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही.

177 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 169 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 52 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 39 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने 31 धावा केल्या. डेव्हिड मिलरने 21 धावा केल्या. हार्दिक पांड्याने ३ बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने 2-2 विकेट घेतल्या. अक्षर पटेलने 1 बळी घेतला.


अक्षर पटेलच्या षटकात हेन्रिक क्लासेनने 24 धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेने 15 षटकांत 4 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. विजयासाठी 5 षटकात 30 धावा हव्या होत्या. यानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन केले.




जसप्रीत बुमराहने पुढच्या षटकात फक्त 4 धावा दिल्या. 24 चेंडूत 26 धावा हव्या होत्या. हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. डेव्हिड मिलर क्रीजवर होता. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेतला. यानंतर भारत चॅम्पियन झाला. 

हेही पहा -----


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖