मुंबई दि. 12 : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक निकाल समोर आले असून त्यात महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
भाजपाच्या 5 उमेदवारांचा विजय तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 2 व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा विजय.
विधानपरिषद निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे – २६ (विजयी)
परिणय फुके – २६ (विजयी)
योगेश टिळेकर – २६ (विजयी)
अमित गोरखे – २६ (विजयी)
सदाभाऊ खोत – २६ (विजयी)
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी – २४ (विजयी)
कृपाल तुमाने – २५ (विजयी)
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर – २३ (विजयी)
शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव – २५ (विजयी)
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर – २४ (विजयी)
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) – १२ (पराभूत)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖