कुंडल : वार्ताहर दि.१५ जुलै २०२४
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाण्याच्या सन २०२४-२५ च्या २३ व्या गाळप हंगामामध्ये १४ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे, यासाठी कारखाण्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले. ते कारखान्याच्या गाळप हंगामाच्या मिल रोलर पुजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, उद्योजक उदय लाड प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार लाड म्हणाले, यावर्षी सुरुवातीपासून पाऊस चांगला आहे. तसेच पाणी योजनांच्या आवर्तने फार लांबणीवर पडलेली नसल्याने उसाचे उत्पादन समाधानकारक मिळणार आहे. कारखाना १० हजार मे टन प्रति दिन क्षमतेने चालणार असल्याने शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी जरी क्रमपाळी असली तरीही जास्ती विलंब लागणार नाही.
केंद्र शासनाच्या धोरणाने इंधनाची गरज लक्षात घेवून सिरप पासून इथेनॉल निर्मिती करून देशाची इंधनाची गरज भागविण्यासाठी हातभार लावला जातोय.
ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांच्या हितासाठी शासनाने यावर्षी साखर निर्यातिचे धोरण गत वर्षीप्रमाणे अंवलंबवावे तसेच पेट्रोलीयम कंपन्यांनी कारखान्याकडून इथेनॉल खरेदी वेळच्या वेळी करून त्यातील टँकर खाली करण्यासाठी होणारी दिरंगाई टाळणेसाठी ठोस उपाय योजना केल्या तर कारखान्यांच्या कामात अजून सुसूत्रता येईल.
यावेळी अध्यक्ष शरद लाड म्हणाले, कारखाण्याकडे सध्य स्थितीला १४ हजार हेक्टर ऊस नोंद आहे, मागील हंगामापेक्षा २० टक्के कमी क्षेत्र नोंद असून सुद्धा यंदा १४ लाख मे.टन गळापाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे केवळ पाऊसमान चांगला झाल्यानेच. यंदा ऊस उत्पादन चांगले मिळेल आणि साधारण १४० दिवस कारखाना हंगाम चालू राहुल असा अंदाज आहे. यातून उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल. त्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूकीचे करार झाले आहेत तसेच मजुरांनाही ॲडव्हान्स दिलेले आहेत.
कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनखाली आणणेसाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. परिसरातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने आपण ऊसाला दर दिला आहे आणि यापुढे हि देऊ. तरी शेतक-यांनी आपल्या नोंद क्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपसरपंच अर्जुन कुंभार, ऍड सतीश चौगुले, श्रीकांत लाड, जगन्नाथ आवटे, सुकुमार पाटील, जितेंद्र पाटील, संजय पवार संचालक, बाळकृष्ण विभूते, दिलीप थोरबोले, अनिल पवार, बाळकृष्ण दिवाण, जयप्रकाश साळुंखे, अरविंद कदम, जगन्नाथ पाटील (मोराळे), कुंडलिक एडके, सुरेश शिंगटे, पंजाब पवार, विनोद देशमुख, माजी उपसरपंच मनोज पवार,महेंद्र करांडे, पोपट संकपाळ, अश्विनी पाटील, क्रांती अर्बन अध्यक्ष धन्यकुमार पाटील, अंजना सूर्यवंशी, संपत सावंत, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, क्रांती करखान्याचे सर्व संचालक, यांचेसह कर्मचारी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सह साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजन प्रसंगी आमदार अरुणअण्णा लाड, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक उदय लाड, संचालक, कर्मचारी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇
https://youtube.com/@thejanshakatinews5707
Portal Link
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖