yuva MAharashtra युवा नेते सुजात भाई आंबेडकर यांना मिरज मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी द्या...

युवा नेते सुजात भाई आंबेडकर यांना मिरज मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी द्या...


 VBA च्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी


सांगली दि. 13  : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात भाई आंबेडकर यांना मिरज विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हा कार्यकारणीच्या आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी  केली.

  सांगली जिल्हा कार्यकारणीची आढावा आढावा बैठक शुक्रवार दि. 12 जुलै रोजी मिरज येथील शासकिय गेस्ट हाऊस येथे पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग)  महावीर(तात्या)ठाण्णप्पा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

बैठकीमध्ये मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सूचना तसेच 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील मिरज मतदार संघातील उमेदवारी बाबत पक्षाची रणनीती कशा प्रकारे करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 
  
  मिरज मतदारसंघाचा उद्धार करायचा असेल विकास करायचा असेल तर निडर ठोस भूमिका घेणारा व वंचित घटकांच्यासाठी तळमळ असणारा नेताच या मतदारसंघाचा उद्धार करू शकतो असे मिरजेच्या जनतेचे मत आहे. 


म्हणून सांगली जिल्हा कमिटी यांनी लोकांच्या आग्रहाखातर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्याकडे युवा नेते सुजात भाई आंबेडकर यांना मिरज मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी  लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

  बैठकीसाठी सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖