BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यामध्ये दुय्यम निबंधक अधिकारी कायमस्वरूपी मिळावा अन्यथा आंदोलन करणार... ...अमरजित कांबळे/अविनाश काळेबाग (आर. पी. आय. A गट)



पलूस दि. 18 : पलूस येथील दुय्यम निबंधक  कार्यालयात गेले १ ते २ वर्षांपासून  प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन  प्रभारी अधिकारी बदलल्याने त्याचे नियम वेगवेगळे असतात.त्यामुळे कार्यालयातील कामकाज पूर्णतः कोलमडले आहे. वेळेवर कामे पूर्ण होत नसल्याने जमीन, प्लाॅट, घर आदी खरेदी - विक्रीसाठी शेतकरी, नागरिकांना कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे. शिवाय वारंवार खेटे मारण्याची वेळ येत आहे. 
शासनाला सर्वाधिक महसूल निबंधक कार्यालयातून जातो. या कार्यालया अंतर्गत कर्ज प्रकरणातील गहाणखत, जमीन, प्लाॅट, घर खरेदी - विक्रीची कामे होतात. पलूस शहरात दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या कार्यालयात रोज मोठ्या प्रमाणावर खरेदी - विक्री करण्यासाठी शेतकरी, नागरिकांची गर्दी असते. 
 त्यातच २ वर्षात आठवड्याला अधिकारी  बदलल्याने येथील कर्मचाऱ्यांवरील वचक कमी झाल्याने कार्यालयातील कामकाज पूर्णतः कोलमडले गेले आहे. परिणामी खरेदी - विक्रीसाठी आलेल्या शेतकरी, नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. कामे वेळेवर होत नसल्याने अनेकदा गोंधळदेखील होत आहे.
खरेदी - विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे, तसेच वारंवार खेटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. एका दिवसाच्या कामासाठी दोन ते तीन दिवस लागतात त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय व आर्थिक नुकसान लक्षात घेऊन पलूस तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधक  अधिकारी कायमस्वरूपी असावा असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन अमरजित कांबळे, आर पी आय पलूस तालुका कार्याध्यक्ष व अविनाश काळेबाग, पलुस तालूका युवक आघाडी अध्यक्ष यांनी मुद्रांक जिल्हा अधिकारी यांना दिले आहे.

 यावेळी अमरजित कांबळे आर पी आय पलूस तालुका कार्याध्यक्ष , अविनाश काळेबाग पलुस तालूका युवक आघाडी अध्यक्ष , पत्रकार पंकज गाडे यांच्यासह आर पी आय चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖