BANNER

The Janshakti News

पलूसकर माध्यमिक विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात.. ..



  पलूस दि. 21 : पलूस येथील  पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात 10 वी विद्यार्थ्यांच्या व पालकांचा मेळावा शनिवार दि.20 रोजी उत्साहात संपन्न झाला.

  यावेळी अध्यक्ष उदय परांजपे  उपाध्यक्ष विश्वास रावळ, मुख्याध्यापक तानाजी करांडे सर्व शिक्षक ,पालक उपस्थित होते.


   परीक्षा विभाग प्रमुख आनंदराव  सावंत,सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब चोपडे ,सौ. प्रज्ञा बिराज ,सौ.प्रियांका तुपे यांनी शैक्षणिक विविध उपक्रम ,स्पर्धा, परीक्षा नियोजन,आहार, संबंधित सूचना दिल्या. 
   अध्यक्ष उदय परांजपे,,मुख्याध्यापक तानाजी करांडे  यांनी आपले मनोगतातून सर्व पालकांना ,शिक्षकांना मार्गदर्शन केले.सर्व पालकांच्या शंकांचे निरसन केले.


  संस्थेचे.अध्यक्ष उदय परांजपे  म्हणाले विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक विकासासाठी विद्यार्थ्यांची संगत महत्त्वाची आहे. पालकांनी नेहमी शिक्षकांच्या संपर्कात  रहावे.संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. नवनवीन क्षेत्रात  वाढती स्पर्धा आहे मुलांची आवड बघून शिक्षण दिले पाहिजे,एकही विद्यार्थी प्रगती यासाठी आपण सर्वानी सजग असायला हवे..विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी अंगी बाळगण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.


    मुख्याध्यापक तानाजी करांडे  म्हणाले विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दाखवण्याचे काम शिक्षक आणि पालकच करतात. विद्यार्थ्यांचा कल आणि गुणवत्ता बघून निर्णय घेणे आवश्यक आहे. शिक्षण पद्धतीत अमलाग्र बदल होत आहेत मूल्यमापन पद्धती बदलत आहेत याची जाणीव ठेवून पालकांनी आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे असे सांगितले.यावेळी सर्व शिक्षक पालक उपस्थित होते. सूञसंचालन सुनील पुदाले,आभार सौ.सुनिता कोळी  यांनी मांनले..

हेही पहा ---


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖