yuva MAharashtra नागरिकांनी घाबरू नये, पण सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

नागरिकांनी घाबरू नये, पण सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी



 

        सांगलीदि. 27, (जि. मा. का.) : नागरिकांनी घाबरून जाऊ नयेपण सतर्कतेने पूर परिस्थितीत प्रशासनसोबत राहून कामकाज करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

            सांगलीमिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील पुर परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगेमनपा आयुक्त  शुभम गुप्ता यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

             तत्पूर्वी जिल्ह्यात दाखल इंडियन आर्मीची तुकडीएन. डी. आर. एफ व मनपा अग्निशमन दल यांनी पूर भागात मॉक ड्रिल करून आढावा घेतला . सध्या पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. जिल्हा प्रशासन,पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व  बाबी पूर्ण केल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सहकार्य करावेअसे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.



            बाधित नागरिकांनी अधिकृत सुचनांचे पालन करावेअफवांवर विश्वास ठेवू नयेकायदा सुव्यवस्था राखावीअसे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले तर मनपा आयुक्त शुभम गुप्ता म्हणालेमहापालिका क्षेत्रातील नागरिकांना मनपा प्रशासना कडून देण्यात आलेल्या सूचनांचे त्यांनीपालन करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे तसेच मनपातर्फे निवारा केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयुक्त श्री गुप्ता यांनी सांगितले .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖