सांगली दि.13 : स्टेशन चौक सांगली येथे विर शिवा काशिद यांच्या 364 व्या पुण्यतिथि निमीत्त वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आजच्या तरूण पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत शिलेदार शिवा काशिद यांचे स्वराज्य निष्ठेचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे असे मत उत्तमराव कांबळे (आबा) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी प्रशांत साळुंखे, निवृत्त अभियंता विजय दिवाण, सौ.सुरेखा सातपुते, आदी नागरीक उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖