BANNER

The Janshakti News

विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन




 

            सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : कृषि विभागामार्फत सन 2023 या वर्षामध्ये कृषि आणि संलग्न क्षेत्र क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्था यांचे विविध कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जास्तीत जास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. विविध कृषि पुरस्कार प्रस्ताव तयार करण्याकामी अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या राज्यातील शेतकरी, महिला शेतकरी, कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना पद्मश्री श्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते, असे श्री. कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖