भिलवडी दि. 27 : 1999 मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी भिलवडी येथे आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
युद्धादरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले आणि "ऑपरेशन विजय" चा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांनी यश मिळवले होते. लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवसांहून अधिक काळ भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरु राहिले आणि शेवटी या लढाईत भारताने युद्ध जिंकले. कारगील युद्धात शहीद झालेल्या व जखमी झालेल्या शेकडो भारतीय जवानांना दरवर्षी प्रमाणे दिनांक 26 जूलै रोजी आजी-माजी सैनिक संघटना भिलवडी यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुमारबापू पाटील उपाध्यक्ष कयुम पठाण महादेव बापू पाटील, प्रताप खंडेराव पाटील, दिनकर जाधव, प्रकाश हिंगणे, संपत गायकवाड, पुंडलिक कोळी, मुकुंदा तावदर, संभाजी कांबळे, सलीम मुल्ला, ग्रामपंचायत भिलवडी सदस्य, शालेय विद्यार्थी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी सैनिक दिनकर जाधव व माजी सैनिक रमेश माने यांच्या हस्ते अमर जवान ज्योतीला पुष्पहार अर्पण करुन शहिद जवानांना श्रध्दांजली वाहिली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुमारबापू पाटील, महादेव बापू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर उपाध्यक्ष कयुम पठाण यांनी आभार मानले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖