सांगली, दि. 4 (जि.मा.का.) : यंदा हवामान विभागाने 100 टक्क्याहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सजग-सतर्क रहावे. तसेच या कालावधीत सर्व संबंधित विभागांनी आपली भूमिका व जबाबदारी समजावून घेऊन अतिशय बिनचूकपणे पार पाडावी, असे आवाहन एन .डी .आर .एफ पथक प्रमुख सर्वेश उपाध्याय यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज आपत्ती नियंत्रण कक्षातील नोडल अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी घटना घडू नये यासाठी दक्ष रहाणे गरजेचे आहे. आपत्तीचा मुकाबला सर्वांनी एकजुटीने करावा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी योग्यरीत्या पालन करावे. आज (शुक्रवार ) सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मनपा क्षेत्रातील आपदा मित्रांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सर्वसाधारण तहसीलदार लीना खरात, एन. डी. आर. एफ टीम सदस्य संभाजी पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖