yuva MAharashtra कृषी विभागाकडील योजनांच्या लाभासाठी महाडीबीटीप्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

कृषी विभागाकडील योजनांच्या लाभासाठी महाडीबीटीप्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन



        सांगली, दि. 4 (जि.मा.का.) : कृषि विभागामार्फत सन 2024-25 अंतर्गत अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत फ्लेझी फंड घटकामधील विविध बाबीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. लाभार्थीची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे केलेल्या ऑनलाईन अर्जातून लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

            या योजनेंतर्गत पाईप्स पुरवठा या घटकाकरीता पाईप प्रकारानुसार किंमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम मर्यादा 15 हजार रूपये प्रति लाभार्थी यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. डिझेल / विद्युत पंपसंच या घटकाकरीता किंमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम मर्यादा 10 हजार रूपये प्रति पंपसंच यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. बीज प्रक्रिया ड्रम या घटकाकरीता किंमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम मर्यादा 8 हजार रूपये प्रति यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. सर्व प्रकारचे ग्राइंडर / पल्व्हरायझर / पॉलीशर (अन्नधान्य पिकांसाठी) या घटकाकरीता किंमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम मर्यादा 60 हजार रूपये प्रति यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. छोटे तेलघाणा सयंत्र या घटकाकरीता किंमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम मर्यादा 1 लाख 80 हजार रूपये प्रति यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. मनुष्य चलित टोकन यंत्र या घटकाकरीता किंमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम मर्यादा 10 हजार रूपये प्रति यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. मनुष्य चलित सायकलवर चालणारे सिड ड्रील या घटकाकरीता किंमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम मर्यादा 5 हजार रूपये प्रति यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.

            या योजनेच्या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूदप्रमाणे वरील सर्व बाबीकरीता प्रवर्ग निहाय देय उच्चतम अनुदान मर्यादा लागू राहील, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖