कुंडल वार्ताहार ता. १२ : पाचवा मैल येथील ७०० मीटर रखडलेल्या महामार्गाचे काम अखेर सुरू झाले. यासाठी पदवीधर आमदार अरुणअण्णा लाड यांनी महामार्ग उपअभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि रस्ते प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
विजापूर गुहागर महामार्गाचे काम पूर्ण झाले तरी पाचवा मैल येथे ७०० मीटर महामार्ग वन खात्याच्या मंजुरी अभावी कित्येक वर्षांपासून रखडलेला होता, हा परिसर वन खात्याच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या मंजुरीची फाईल दिल्ली दरबारी रेंगाळत असल्याचे निदर्शनास आले होते यामुळे सामान्य नागरिकांना मात्र मरण यातना भोगाव्या लागत होत्या. अनेकांनी प्रयत्न करून परवानगी आजरोजी अखेर आली नसल्याने आमदार अरुणअण्णा लाड यांनी तडजोडीचा मार्ग काढून हा ७०० मीटर चा महामार्ग जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत डांबरी करण्याची विनंती महामार्ग प्रशासनाला केली यावर त्यांच्याकडून होकारार्थी उत्तर आल्याने या महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांना खूप दिलासा मिळाला पण प्रत्यक्षात काम मात्र सुरू नव्हते ते आज सुरू झाले.
याच प्रकारे विजापूर गुहागर महामार्गावरील २२ पुलांची कामे ठेकेदारांच्या दिरंगाई मुळे रखडलेली होती त्याला ही मार्ग काढून ती सर्व डांबरीकरण करून देण्यासाठी आमदार लाड यांनी प्रयत्न केले होते. ठेकेदार सोडून गेला असे कारण सांगण्यापेक्षा ते सर्व 22 पूल तात्पुरते डांबरीकरण करून घेतले आणि भविष्यात भविष्यात पुन्हा निविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराला फक्त पुलांचे कोंक्रेटिकरन आणि रुंदी वाढविणेसाठी प्रयत्न केला जाणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून वन खात्याची अडचण सांगत हा रस्ता अपूर्ण होता पण किमान जुना रस्ता तरी नागरिकांना करून द्यावा यासाठी आम्ही टोकाचे प्रयत्न केले. आजरोजी त्याला यश आले आहे. शासनाच्या नाकर्तेपना मुळे लोकांना हाल सहन करावे लागले आहेत. पण आजरोजी अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे...आमदार अरुणअण्णा लाड.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖