BANNER

The Janshakti News

डी‌.एड , बी एड सुशिक्षित बेरोजगारांचे मागण्या विधानसभेत मांडून सोडवण्याचा प्रयत्न करू - आ‌.अरूण (आण्णा) लाड



                                व्हिडीओ 



   सांगली दि. 21 : डी.एड बी.एड सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कृती समितीचे राज्य अध्यक्ष पद्माकर देशमुख यांचे दि‌.18/07/2024 पासून डी.एड बी.एड सुशिक्षित बेरोजगाराच्या विविध मागण्या घेऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरु होते.
 या उपोषण स्थळी आज पदवीधर  आमदार अरुण (अण्णा) लाड यांनी भेट दिली आणि उपोषणकर्त्यांच्या बरोबर मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करुन सदरच्या मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल आणि सदरच्या मागण्या विधानसभेत मांडून सोडवल्या जातील अशा पद्धतीचे आश्वासन दिले. 



   यावेळी आ‌मदार अरूण (आण्णा) लाड  व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा)  यांनी उपोषणकर्ते  पद्माकर देशमुख यांना निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडले.
  
 यावेळी विद्यासागर ढोबळे, श्वेता शिंदे, सुवासिनी रासाटे, आकाश कांबळे, विलास कांबळे, सिध्दार्थ कांबळे, अनमोल कांबळे, माणिक नंदीवाले, गणेश दोरकर, धनाजी कांबळे आदी उपस्थित होते.

हेही पहा --


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖