BANNER

The Janshakti News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यशासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक




 

        सांगलीदि. 2, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे हाराष्ट्र कला अकादमीमुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आय. डी. वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल, असे अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            ही स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रमसांस्कृतिक स्पर्धाचे आयोजनसंस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रमगडकिल्ले यांचे जतन व संवर्धनराष्ट्रीय व राज्य स्मारकेधार्मिक स्थळे याविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धनविविध सामाजिक उपक्रम व कार्येपर्यावरणपूरक मूर्तीपर्यावरणपूरक सजावटध्वनिप्रदूषण रहित वातावरणगणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

            दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबईमुंबई उपनगरठाणे आणि पुणे हे 4 जिल्हे प्रत्येकी 3 आणि हे ४ जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील.


            

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना रु. 25,000/- रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.


 या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖