कुंडल : वार्ताहर दि. 11 Aug 2024
दिल्ली येथे क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांचा " उक्तृष्ट ऊस विकास संवर्धनाचा" देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय सहकारमंत्री अमित शहा यांचे हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, आमदार अरुण लाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला
यावेळी, केंद्रिय सहकारमंत्री अमित शहा,केंद्रिय सहकार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भारत सरकार - सहकार राज्य मंत्री कृष्ण पाल, उत्तरप्रदेश ऊस मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण सिंह राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
2022-23 सालात जास्त साखर उताऱ्याच्या विभागात ऊस विकासात भरीव काम करणाऱ्या कारखान्याना हा पुरस्कार देणेत येतो. हे आमदार अरुणअण्णा लाड यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा पुरस्कार मिळाला
देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे अनेक बाजूंनी कारखान्यांचा अभ्यास केला जातो. यातीलच एक ऊस उत्पादकता हा असून क्रांती सहकारी साखर कारखान्याला त्यातील काटेकोर मूल्यमापन करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
कारखान्याने ऊस विकास आणि ऊस क्षेत्र वाढीसाठी केलेले भरीव काम, पाण्याचा योग्य वापर आणि खतांचा कार्यक्षम वापर करून कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न घेणेसाठी केलेले प्रयत्न. पाचट कुजवून सेंद्रिय कर्ब वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि यातून सकारात्मक आलेले निष्कर्ष, नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहीचवून त्याचा स्वीकार करून त्यानुसार ऊस क्षेत्रात केलेली आधुनिक क्रांती या सगळ्याचा विचार करून हा पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापु लाड सहकारी साखर कारखान्यास हा पुरस्कार नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र जनपथ नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी दिलीप लाड, सचिन कदम,कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, श्रीकांत लाड, वसंत लाड,क्रांतीचे संचालक,दिलीप थोरबोले,शितल बिरनाळे,अनिल पवार, तात्यासाहेब वडेर, जयप्रकाश साळुंखे,संजय पवार,विजय पाटील , संग्राम जाधव, सुकुमार पाटील,अशोक विभुते,वैभव पवार, जितेंद्र पाटील, अश्विनी पाटील,अंजना सुर्यवंशी, तसेच अशोक पवार, सुनिल पवार, यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांचा " उक्तृष्ट ऊस विकास संवर्धनाचा" देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मा.केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारताना कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड ,आमदार अरुण लाड,दिलीप लाड, सचिन कदम,कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे,शेती अधिकारी दिलीप पार्सेकर,उस विकास अधिकारी विलास जाधव, सर्व संचालक, कर्मचारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖