सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी व या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त जनतेने सक्रीय सहभाग घ्यावा याकरिता 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा या कार्यक्रमांतर्गत तिरंगा यात्रा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा मानवंदना, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा दौड, तिरंगा कॅनव्हास असे विविध कार्यक्रम या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.
दिनांक 13, 14 व 15 या तिनही दिवशी प्रत्येक घरोघरी तसेच दुकाने, खाजगी आस्थापना व सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवावा. या अभियानात सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हेही पहा ----
https://youtu.be/59rpNgCMEUw?si=bfh4xqEB4CY6MzA7
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖