BANNER

The Janshakti News

विद्यार्थ्यांच्या सरणावर तीर्थ दर्शन यात्रा, दिंडी, आणि वारकरी महामंडळ.. सामाजिक अन्यायाची परिसीमा..






पुणे : दि. 14 Aug 2024

अमोल वेटम ,

( रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख )



विद्यार्थ्यांच्या सरणावर तीर्थ दर्शन यात्रा, दिंडी, आणि वारकरी महामंडळ.. सामाजिक अन्यायाची परिसीमा..

बार्टी महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा आस्वार यांना तत्काळ हटवा, मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा विद्यार्थ्यांची मागणी, हाकेच्या अंतरावर असणारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग झोपेचे सोंग घेत आहे का ?




           Videos of student protests

बार्टी संशोधक विद्यार्थी हे गेले नऊ दिवसापासून पुणे कार्यालय समोर बेमुदत उपोषणास बसलेले आहेत. त्यांची मागणी आहे की सन २०२१-२२ पासून थकीत असणारी फेलोशिप सरसकट तात्काळ देण्यात यावी. परंतु याकडे मनुस्मृति वर आधारित असणारे राज्य सरकार (देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार) याकडे कानाडोळा करताना दिसते. अनुसूचित जातीमध्ये जवळपास ५९ जातींचा समावेश आहे यामध्ये बहुतांश हे हिंदू जातीतले आहेत. हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेते परंतु मागासवर्गीय हिंदू समाजावर जेव्हा अन्याय होतो त्यावेळी हे हिंदुत्व कुठे जाते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी तीर्थ दर्शन योजना, वारकरी महामंडळ व दिंडी यात्रा करता मोठ्या प्रमाणात वळवण्यात आलेला आहे. सांस्कृतिक व क्रीडा विभाग स्वतंत्र असताना त्याचा निधीचा वापर न करता सामाजिक न्याय विभाग हे पर्यटन खाते आहे का असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. एकीकडे फेलोशिप साठी पैसे दिले जात नाहीत परंतु तीर्थ दर्शन व इतर योजनांसाठी पैसे जाणीवपूर्वक वळविण्यात आलेले आहेत. एकंदरीत अनुसूचित जातीचे शैक्षणिक आर्थिक व सामाजिक नाकेबंदी करून पुन्हा गळ्यात मडके पाठीला खराटा बांधण्याचे धोरण हे मनुवादी भाजप सरकारने आखलेला आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व इतर विरोधी पक्ष यावर ' ब्र ' देखील काढण्यास तयार नाहीत.

विद्यार्थी आज रोजी मरणाच्या दारात उभा असताना, यावर बोलायला कोणीही तयार नाही. तसेच या समाजातील आमदार, खासदार हे देखील मुग गळून गप्प आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖