बलात्कार ही देखील एक मानसिकताच
बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या पावणेचार वर्षे आणि सहा वर्षाच्या मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत लाजिरवाणी घटना...
आज लोकं रस्त्यावर उतरली आहेत..
राजकारण्यांनी, ग्रहमंत्र्यांनी आता नक्की सांगावे की आपल्या लाडक्या लेकी,लाडक्या बहिणी, माता किंवा सर्व महिला नक्की कुठल्या ठिकाणी सुरक्षित आहेत ?
असे कोणते ठिकाण असेल जिथं त्या स्वतःला सुरक्षित महसुस करतील ???
आपल्या सर्वांना या घटनेची शरम वाटायला हवी अशी ही अत्याचाराची घटना आहे ?,
हा आहे आधुनिक महाराष्ट्र (?),हेआहेत नव्या भारत देशाचे(?) लोक ?
लोकांची मानसिकता सुधारणा कार्यक्रम, लोकांचे मानसिक आरोग्य सुधारणे, बुरसटलेल्या मानसिकतेच्या लोकांसाठी किंवा अनैतिक, गैरविचारांच्या लोकांचे योग्य वेळी व्यवस्थित निदान करून त्यांना पुन्हा एकदा मूल्य शिक्षण/वर्तन सुधारणा/ नैतिकतेचे शिक्षणदेण्याची नितांत गरज आहे
कोणत्याही चांगल्या-वाईट घटनेसाठी आपण सर्वजण समसमान जबाबदार असतो त्यामध्ये आपली कुटुंबसंस्था, शाळा, महाविद्यालये, धर्मसंस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष हे सर्वच समान प्रमाणात जबाबदार आहेत त्यामुळे ग्रामपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका, विधानभवन, संसद येथे पोहोचनार्यांनी राज्यघटनेत नमूद आणि अपेक्षित असे कल्याणकारी राज्याचे शिलेदार,राज्यकर्ते,शासनकर्ते म्हणून सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची नैतिक जबाबदारी घेऊन यावर वेळीच उपाययोजना कराव्यात हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
आपला,
प्रा चेतन दिवाण,
कर्वे समाजसेवा संस्था, पुणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖