सांगली दि. 21 : भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्ह्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या अनुसूचित जातीतील जात वर्गीकरणाबाबत असंविधानिक निर्णयाच्या विरोधात भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा व वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष तामगावकर म्हणाले सदरचा संविधानिक निर्णय घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाला कोणताही अधिकार नसून सदरचे निर्णय हे लोकसभेत बहुमताने मंजूर करून घ्यावयाचे असतात. तरी सदर निर्णयाचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करत असून तो निर्णय तात्काळ रद्द करावा व जात वर्गीकरण रद्द करावे असे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर सरचिटणीस संजय कांबळे कोषाध्यक्ष विशाल कांबळे तसेच वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार युनियनचे संपर्कप्रमुख संजय भुपाल कांबळे साहित्यिक दिनकर काकडे संभाजी कांबळे, जितेंद्र कोलप,रतन तोडकर , बाळासो भंडारे दीपक कांबळे, जगदीश कांबळे, चांगदेव कांबळे,पद्मश्री कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖