yuva MAharashtra पलूस शिक्षण प्रसारक मंडळच्या इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे जवानांना राख्या रवाना.

पलूस शिक्षण प्रसारक मंडळच्या इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे जवानांना राख्या रवाना.


   


                                VIDEO 




पलूस दि 14 : सीमेवर लढणाऱ्या जवानांना त्यांच्या घरापासून कुटुंबापासून सातत्याने दूर राहावे लागते. तरीसुद्धा ते निष्ठेने देश सेवेत अहोरात्र कार्यरत असतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने वीर जवानाप्रती आपुलकीची भावना व आदर व्यक्त करण्यासाठी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थी व शिक्षकांनी राखी पाठवण्याचा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी हाती घेतला. 


ज्या जवानांची मुले या शाळेत शिकत आहेत त्यांचे कुटुंबीय व मुलांच्या हाती राख्या देऊन रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या राख्या जम्मू-काश्मीर येथे 14 मराठा लाईट इनफंट्री रेजिमेंटचे हवालदार मा.श्री .हिम्मतराव बंडू निकम यांच्या  हाती सोमवार दिनांक 12/ 8/ 2024 रोजी  सुपूर्द करण्यात आल्या. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष मा.श्री  प्रकाश पुदाले (सर), उपाध्यक्षा मा.डॉ.आशाताई पाटील (माई ), उपाध्यक्ष मा. श्री.संदेश कुलकर्णी( सर), सचिव मा.श्री धोंडीराम शिंदे (सर), सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सौ.जयमाला पाटील मॅडम यांनी राबवला.

यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖