BANNER

The Janshakti News

भिलवडी गावचा आधारवड हरपला ; संग्राम (दादा) पाटील यांचं दु:खद निधन





भिलवडी दि. 28 : पलूस तालुक्यातील भिलवडी येथील काँग्रेसचे प्रमुख नेते व सांगली जिल्हा परिषदेचे माजी सद्स्य संग्राम दादा पाटील यांचे मंगळवार (२७ ऑगस्ट  २०२४) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. पंधरा दिवसापूर्वी असवस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना सांगली येथील उषा:काल हॉस्पिटलमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  गेले पंधरा  दिवस त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते परंतू दिवसेंदिवस तबियत खालावल्यामुळे अखेर मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास   हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मृत्यूसमयी संग्राम दादा पाटील यांचे वय अंदाजे ५१ वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाची वार्ता भिलवडी सह परीसरात कळताच शोककळा पसरली.

 त्यांच्या निधनाने सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला. काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता ही प्रतिमा कायम राहिली. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा कधी बाजूला ठेवला नाही.



२००७ मध्ये ते सांगली जिल्हा परीषदेवर निवडून आले. संग्राम दादा यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात  भरीव काम केले. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गिय डॉ. पतंगरावजी कदम साहेब आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना त्यांनी समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून सामान्यांना बळ देण्याचे काम केले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.

त्यांच्या अकस्मात निधनामुळे भिलवडीसह परीसरात तसेच मित्रपरिवारात शोककळा पसरली असून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांचे पार्थिव आज दि. २८ ऑगस्ट  रोजी सकाळी ७:३० वाजता भिलवडी येथे आणले असून सकाळी ८:०० वाजता अंतयात्रेला सुरुवात होऊन ११:०० वाजता कृष्णा घाट येथे अंत्यविधी होणार आहे. 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖