सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीवर नोंदणीकृत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादी मधील पात्र वैयक्तिक खातेदार शेतकऱ्यांनी संमती पत्र व सामायिक खातेदार शेतकऱ्यांनी सामायिक खातेदार ना हरकत पत्र आधार लिंक बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी संबंधित गावाच्या कृषि सहाय्यक यांच्याकडे तात्काळ जमा करावेत, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेच निकष - सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रु. तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रु. (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहील. ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अॅप/पोर्टलव्दारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील. ई-पीक पाहणी अॅप, पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करुन अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. योजना फक्त सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील.
हेही पहा ----
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖