BANNER

The Janshakti News

प्रशासनाने चोरांच्या मुसक्या आवळाव्यात ; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक..




पलूस : प्रतिनिधी       दि. 13 Aug 2024

भिलवडी : धनगांव (ता.पलूस) येथे चोरट्यांनी भरदिवसा उषा निखिल सुर्यवंशी (वय ३५) यांना मारहाण करून कानातील व गळ्यातील सोने चोरून लंपास केले. सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या मारहाणीत महिला जखमी झाल्याने त्यांच्यावर  सांगली येथे उपचार सुरू आहेत. 
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सदरची महिला घरात कपडे धूत असताना
एक पुरुष व महिला दोघांनी आत प्रवेश केला. घरात महिला एकटीच असल्याने चोरट्यांनी संधी साधली. महिलेला मारहाण करून गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले.

हा प्रकार समजताच धनगाव सह आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये खळबळ माजली. मारहाण व चोरी झाल्याने सदरची महिला तासभर बेशुद्धावस्थेत होती. प्रचंड घाबरून गेली होती. रक्तस्त्राव झाला होता. दरम्यान चोरीच्या या प्रकाराने भिलवडी परिसरात खळबळ माजली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी शेरीभाग आमणापूर येथे चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या काहीजणांना हटकल्यावर ते पळून गेले. काहींनी नदीत उड्या घेतल्या. तरुणांनी धाडसाने तिघांना पकडून भिलवडी पोलीसांच्या ताब्यात दिले. अंकलखोप येथील एम.एस. स्टील येथेही दोन दिवसांपूर्वी रात्री चोरी झाली आहे. चोरट्यांना चोप मिळूनसुद्धा भरदिवसा महिलेवर हल्ला झाल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली आहे. दिवसा चोरी करणे म्हणजे धाडसाचे लक्षण असल्याची चर्चा आहे. 


पलूस तालुक्यात वाढत्या चोरी संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरच या चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी आमदार अरुण लाड व शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पलूस तालुका युवक कार्यकर्तेनी पलूस तहसीलदार दीप्ती रिटे यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पलूस तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पहा ----

https://youtu.be/byQeYNd5oto?si=53M3TzCnkfH6IZy_

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖