yuva MAharashtra मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील दि. 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू केली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय विभागाकडील दि. 9 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थीनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगाव रोड सांगली यांच्याकडे शासन निर्णयातील अटी व शर्तीची पुर्तता करून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🔴 https://youtube.com/@thejanshakatinews5707

🔴 https://www.theJanShaktiNews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖