BANNER

The Janshakti News

पलूसकर माध्यमिक विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न




पलूस दि. 26 : पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय येथे अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

 या मेळाव्याचे उद्घाटन शैक्षणिक संकुलाचे सचिव जयंतीलाल शहा,ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत, बळीराम पोतदार अविनाश चव्हाण,शामकांत मेंगाने , यांच्या शुभहस्ते करण्यात आले.



  या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण ९० उपकरणे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली आहेत. ही उपकरणे सर्व विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी मांडलेली आहेत. या सर्व कक्षांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम.  डॉ रघुनाथ माशेलकर, डॉ. होमी जहांगीर भाभा या  शास्त्रज्ञांची नावेेे दिलेली  आहेत.



       सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी  तयार केलेल्या या प्रयोगाचे  कौतुक केले. व  मार्गदर्शन केले. संयोजन विज्ञान विभाग प्रमुख प्रज्ञा बिराज ,अमिता  कुलकर्णी,कविता कदम, स्मिता साळुंखे, मेघा बंडगर.प्रियांका तुपे,रूकैय्या जमादार,प्रयोगशाळा परिचारक जगन्नाथ सुवासे  सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी केले..शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे, सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी सहभागी शिक्षकांचे अभिनंदन केले...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖