BANNER

The Janshakti News

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील कर्ज योजनांसाठी गरजू व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन




 

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल, थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण येाजना अशा विविध  कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. इतर मागास प्रवर्गामधील गरजू व्यक्तींनी कर्ज योजनांकरीता www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. के. दरेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय  वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत गुरव समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ तसेच नाभिक समाजाच्या विकासासाठी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ शासनाने स्थापन केलेली असून सांगली जिल्हा स्तरावरील कामकाज कार्यान्वीत करण्यात आले आहे. या विविध महामंडळाच्या कर्ज योजनांचे सन 2024-25 चे भौतिक व आर्थिक उद्दिष्‍ट व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली, पिनकोड-416416, दुरध्वनी क्र. 0233-2321513 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. दरेकर यांनी केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖