BANNER

The Janshakti News

आश्वासन देऊनही बांधकाम कामगारांच्या‌ सुशिक्षित पात्र मुलांना डावलून कामगार भरती. वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन आक्रमक..









सांगली दि.६ : बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर मंडळाच्या कार्यालयात कामासाठी नोकरीत घ्या 
या मागणीसाठी, वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचे मिरज तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रासमोर निदर्शने केली.व अधिकारी यांना धारेवर धरले.संघटना पदाधिकारी व अधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.व जोरदार घोषणाबाजी झाली.


यामध्ये संघटना पदाधिकारी म्हणाले की बांधकाम कामगारांच्या पात्र मुलांना कायम अथवा कत्राटी भरती मध्ये समावेश झाला पाहिजे असे लेखी आदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात आले असूनही त्यांची कार्यवाही सांगली जिल्ह्यात होत नाही. येथील सहायक कामगार अधिकारी फक्त पोस्टमनची भुमिका बजावत असून कोणत्याही प्रश्नांबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बोट दाखवत आहेत. सांगली जिल्ह्यात बोगस कामगार नोंदणी जोरात सुरू आहे.वारंवार संघटनेने निदर्शनास आणूनही कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. मिरज विधान सभा मतदारसंघात ग्रामीण भागात सरपंच यांनी ग्रामसेवकाला तसे धरून मोठ्या प्रमाणात लोकांची बोगस बांधकाम कामगार नोंदणी केली आहे. व त्या बोगस नोंदणी धारकांना बांधकाम कामगारांच्या हक्काचे विविध कल्याणकारी योजना तसेच आर्थिक लाभ वाटले आहे . एजंट व अधिकारी यांची साखळी असल्याने बांधकाम कामगार मंडळात लुटीचा धंदा सुरू आहे व खरा लाभार्थी योजनेपासून वंचित आहे.

मिरज तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांना उद्घाटन करण्यास अडवण्यात आले व जोरदार घोषणाबाजी झाली व काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले व चौकशी करून तात्काळ कारवाई  करण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे,जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जगदीश कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, विशाल कांबळे, विशाल धेंडे, संदीप कांबळे, बंदेनवाज राजरतन, संगाप्‍पा शिंदे, जावेद आलासे, चंद्रकांत कांबळे, प्रकाश कांबळे, युवराज कांबळे, सतीश शिकलगार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖