yuva MAharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप जिल्ह्यात दाखल

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप जिल्ह्यात दाखल




       सांगलीदि. 23 (माध्यम कक्ष) : 

सांगली, मिरज, वाळवा, शिराळा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी खर्च निरीक्षक म्हणून श्री. करणी दान  (आय.आर.एस.) हे सांगली जिल्ह्यामध्ये आले आहेत.

 

 त्यांच्या कार्यालयाचा पत्ता
जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण कक्षस्थायी समिती (राजाभाऊ जगदाळे सभागृह)सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सांगली असा आहे. तर ई-मेल आय.डी. eobservermlasangli@gmail.com असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 9307964778 हा आहे.

             खर्च निरीक्षक आज सांगलीमिरजवाळवाशिराळा विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. सांगलीमिरजवाळवाशिराळा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मधील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास वरील नमूद ईमेल वर अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावाअसे आवाहन खर्च निरीक्षण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी केले आहे.


खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप जिल्ह्यात दाखल

 

  

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कवठेमहांकाळ तासगावविटाजत आणि पलूस - कडेगाव मतदारसंघांसाठी मा. भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप (आय. आर. एस.) सी व सीई यांचे सांगली जिल्ह्यामध्ये आगमन झाले आहे. त्यांच्या कार्यालयाचा पत्ता जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्ष हा स्थायी समिती (राजाभाऊ जगदाळे सभागृह) सभागृह
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकासांगली येथे आहे. त्यांच्या ई मेल आयडी expenobserversangli@gmail.com असा असूनभ्रमणध्वनी क्रमांक 9307949547 असा आहे.

          खर्च निरीक्षक कवठेमहांकाळ – तासगावविटाजत आणि पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून आढावा घेणार आहेत. या मतदारसंघांतील उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास दिलेल्या ई-मेल अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन खर्च निरीक्षण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707

➡️ https://www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰